Posts

Showing posts from March, 2021

नोंद...

       जो पर्यंत फॉर्मल संवाद संपवता येत नाही तोपर्यंत ओळखीचे रुपांतर मैत्रीत होत नाही. नाहीतर 'कसा/कशी आहेस?', 'झालं का J1 ? ' यांसारख्या मरगळलेल्या प्रश्नांमध्ये कितीतरी 'ओळखी' आणि 'ओळखीची माणसं' खितपत पडून आहेत. डोकं फुटोस्तोवर लोक नुसता विचार करत असतात कित्येक विषय डोक्यात घोळवत. लोक जज करतील या एवढ्या भितीपोटी कित्येक जण सारं काही आलबेल असल्याचा आव आणत जगतात. स्वतः च्या 'प्रतिमेवर' विश्वास असला की लोकांची 'जजमेंट' झटक्यात फाट्यावर मारता येते. मग संवादाच्या वाटा गवसतात. लोकं बिंधास्त बोलू शकतील एवढी सहजता देणं अन् आपले बोलणे ऐकायला ही तेवढ्याच सहजपणे लोकं लाभणं ही मैत्रीतील सुंदर कलाकृती आहे. ती कधीच 'ओळखीत' सापडत नाही... -dj