Posts

Showing posts from October, 2021

The poem....

 तुझं अस्तित्व पसरलंय पहाटेच्या धुक्यासारखं शहरभर... तू  भेटतेस मला आजकाल खिडकीवर साचलेल्या दवबिंदूंमधून... तुझेच भास भरलेत  या आसपासच्या हवेत. तुझाच सुगंध वाहून आणते ही हवा घुटमळते माझ्या सभोवताली... कधी नजर शोधत राहते  तुला या भरलेल्या गर्दित तुझा कानोसा घेत मग मी पालथा घालतो  या शहराचा कोपरान् कोपरा तेव्हा तू मला भेटते  पारंपारिक पोषाखात  यशस्वी सहजीवनाचं स्वप्न  भल्याथोरल्या होर्डींगवरील जाहीरातीमधून विकताना.. या रखरखीत  उन्हाला पाहून प्रश्नतात माझे डोळे तोंडाला स्कार्फ बांधून तू जात असशील काय समोरून माझ्या मृगजळासारखे चकवे देत तुझा आवाज ऐकण्यासाठी  हुंगत राहतो मी  कित्येक गर्दिचा गोंगाट  कानात प्राण आणून मात्र मी भलताच दचकतो  तुझ्यासारख्या देहबोलीची  पाठमोरी आकृती  माझ्याकडे वळून बघताना  तुझ्या भासांनी भांबावून गेलेला मी तुझ्या आठवणींना  सोडून येतो  शहराबाहेर अज्ञातस्थळी कुठेतरी तर मी पोहचण्याच्या आत मांजरासारखा माग काढत  घरी पोहचतात तुझ्या आठवणी...           ...